प्रकल्पाचे नाव 
विद्यार्थ्याचे नाव :सुदर्शन फासे   
साथीदाराचे नाव : शिवम थोरात
मार्गदर्शक शिक्षकांचे नाव : अरुण दिक्षित सर ,विश्वास सर ,जाधव सर ,
प्रकल्पाचे नाव : बायो ड्रम तयार करणे.




अ क्र
विषय
१.)
प्रस्तावना
२.)
उददेश
३.)
साहित्य
४.)
साधने
५.)
कृती
६.)
साध्य
७.)
उपयोग
८.)
अडचणी /अनुभव
९.)
अंदाजपत्रक
                        




प्रस्तावना:-
सध्या सर्वांना घरातील ओल्या कचऱ्याची समस्या  भेडसावत आहे, मुख्यतः किचन मधील कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न गंभीर होता पण त्याला एक उपाय होता तो म्हणजे गांडूळखतासाठी वापर करणे, पण त्या कचऱ्याचे खतात रूपांतर खतात होण्यासाठी खूप कालावधी लागतो तेवढा कालावधी आपल्याजवळ नसतो,दीक्षित सरांनी आम्हाला सांगितले कि कचरा लवकर कसा कुजवता येईल आणि नंतर आम्ही कामाला लागलो.
उददेश :
आमचा हा प्रकल्प तयार करण्याचा एकच उद्देश होता की, घरातील ओल्या कचऱ्याचे लवकरात लवकर खतात कसे रुपांतर करता येईल.
साहित्य:-
आम्हाला त्यासाठी वेगवेगळे साहित्य लागले ते खालीलप्रमाणे....
 १.) ड्रम
 २.) स्क़्वेअर ट्युब
 ३.)L-अँगल (२५*२५*३)
 ४.) लॉकर
 ५.)पट्टी
 ६.)पाईप
साधने:-
वेल्डिंग मशीन,वेल्डिंग रॉड,कटर मशीन,मोजपट्टी,ड्रिल मशीन,पेन्सील, कलर,




कृती:-
पहिल्यांदा आम्ही दिक्षित सरांनी सांगितलेली कन्सेप्ट समजावून घेऊन मग नंतर प्रकल्प करण्यास सुरुवात केली
१.)प्रथम आम्ही ड्रम भोवती त्याला घट्ट पकडण्यासाठी दोन्ही साईडला दोन ब्रॅकेट तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी आम्ही पट्टी वापरण्याचे ठरवले पट्टी वापरून दोन ब्रॅकेट तयार केली पण ती ड्रम भोवती नीट बसत नसल्यामुळे ते ब्रॅकेट आम्ही नाही वापरले  
२.) दुसऱ्यांदा आम्हाला विश्वास सरांनी रॉड वापरून ब्रॅकेट तयार करायला सांगितले. आम्ही रॉड आणि काही प्रमाणात पट्टी वापरून ब्रॅकेट तयार केले. पण त्याची उंची कमी जास्त झाल्यामुळे ते देखील ड्रम वर पूर्ण नीट बसले नाही  म्हणून ते देखील वापरता आले नाही.
३.)  वरती जे दोन ब्रॅकेट  तयार केले ते पूर्ण गोल तयार केलेले होते म्हणून ते ब्रॅकेट  ड्रम वर बसवायला अडचण येत होती तिसऱ्यांदा जेव्हा विश्वास सरांनी आम्हाला पट्टी वापरून ब्रॅकेट तयार करायला सांगितले तेव्हा ते पूर्ण गोल न बनवता अर्धे अर्धे असे चार ब्रॅकेट तयार करायला सांगितले  त्याची कृती खालील प्रमाणे
 पहिल्यांदा आम्ही पट्टी घेतली नंतर त्या पट्टीला योग्य मापनात कटर मशीनच्या सहाय्याने कापून घेऊन  त्या गोल करण्यासाठी रोलर मशीनचा वापर केला, नंतर त्या पट्ट्या वेल्डिंग मशिनच्या सहाय्याने जोडून  एक असे चार  ब्रॅकेट तयार केले. त्या तयार झालेल्या ब्रॅकेट्स ला एकमेकांना ड्रम भोवती जोडण्यासाठी नट-बोल्ट ला त्या पट्ट्यांसोबत वेल्ड केले.
४.) ड्रम ला लॉकर बसवण्यासाठी  आम्ही ड्रिल मशीनने ड्रमला होल पाडले. नंतर लोकर नट-बोल्ट च्या सहाय्याने  जोडून घेतला.
५.) नंतर तयार झालेला ड्रम ब्रॅकेट आम्हाला एका स्टँन्डवर फिट बसवायचा होता, त्यासाठी एक स्टँन्ड तयार करायचा होता त्यासाठी आम्ही स्क़्वेअर ट्यूब(२*२) आणि (२५*२५*३)L- Angle, पाईप यांचा वापर केला  त्याची कृती
पहिल्यांदा आम्ही L- Angle वापरून एक आयताकार फ्रेम तयार केली नंतर त्या फ्रेम ला वेल्डिंगच्या सहाय्याने जोडून घेतले नंतर दोन स्क़्वेअर ट्यूब  ते एकमेकांना समोरा-समोर ठेऊन ते देखील जोडून घेतले  

साध्य:-
आम्हाला साध्य करायचे होते कि घरातील ओला कचरा वापरून त्याचे लवकरात लवकर खत तयार करणे.
उपयोग:-
ह्या बायो ड्रमचा उपयोग आपण प्रत्येक घरांमध्ये मोठमोठ्या वसाहतींमध्ये देखील करू शकतो. त्यामुळे प्रत्येक घरातील ओल्या कचऱ्याची घरांमध्येच विल्हेवाट लागेल. यातून तयार होणारे खत आपण आपल्या परिसरात असणाऱ्या झाडांना, लहान फुल झाडांना, किंवा शेतात देखील त्याचा वापर करू शकतो. 
अडचणी:-
आम्हाला प्रकल्प तयार करताना वीजेची अडचण आणि काही साहित्य वेळेवर मिळाले नाही.    
अनुभव:-
 वेल्डिंग करण्याचा अनुभव आला  रोलर मशीन वापरण्याचा जास्त अनुभव आला,






अ क्र
साहित्याचे नाव
एकूण साहित्य
दर
एकूण किंमत
(२५*२५*३)L- Angle
12ft
40 kg
240
स्क़्वेअर ट्यूब(२*२)
6ft
40 kg
210
पट्टी
9ft
40 kg
165
पाईप 2 inch
6 inch
40 kg
10
लॉकर
1
50
350
नट बोल्ट
8
5
50
वेल्डिंग रॉड
8

40
पाईप १ inch
ft
40kg
40









1105

Electricity = 1105*15/100 = 165 रुपये
मजुरी = 1105*10/100 = 110 रुपये
एकूण खर्च = 1380 रुपये


Comments

Popular posts from this blog