Posts

Showing posts from January, 2017
Image
                                               दिनांक :१५/११/२०१६                   शेती व पशुपालन        या विभागामधील कामांची माहिती जाणून घेतली  तसेच आम्ही हायड्रोपोनिक चार म्हणजेच माती शिवाय तयार करण्यात येणारा चारा तो तयार करण्यासाठी ७ किलो ८८० ग्रॅम मका घेऊन तो निवडून घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला.नंतर तो मका ४ लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवला. तो भिजत ठेवलेला मका सुमारे १२ तास भिजत ठेवणे गरजेचे असते.              नंतर आम्हाला काही शेती आणि पशुंसंदर्भात करावयाच्या कामांची माहिती आणि त्याची नोंद कशाप्रकारे ठेवायची हे समजावून सांगितले. मला “ गो पालन “संदर्भात काम मिळाले. दिनांक :१६ /११/२०१६        आय.बी.टी.ट्रेनिंग सोबत आम्हाला देखील आमचे प्रॅक्टीकल तयार करायला मिळाले ते असे पहिल्यांदा आम्ही काल भिजवून ठेवलेला मका घेऊन तो एका स्वच्छ पोत्यामध्ये घटट १५ ते १६ तास गुंडाळून ठेवले.  नंतर तो मका स्वच्छ केलेल्या ट्रे मध्ये ठेवून ते ट्रे तय्यार केलेल्या हायड्रोपोनिक होम मध्ये चारा तयार होण्याकरिता ठेवले. दिनांक :१७/११/२०१६ मातीचा नमुण्याचे परीक्षण केले मात