दिनांक :१५/११/२०१६ शेती व पशुपालन या विभागामधील कामांची माहिती जाणून घेतली तसेच आम्ही हायड्रोपोनिक चार म्हणजेच माती शिवाय तयार करण्यात येणारा चारा तो तयार करण्यासाठी ७ किलो ८८० ग्रॅम मका घेऊन तो निवडून घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला.नंतर तो मका ४ लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवला. तो भिजत ठेवलेला मका सुमारे १२ तास भिजत ठेवणे गरजेचे असते. नंतर आम्हाला काही शेती आणि पशुंसंदर्भात करावयाच्या कामांची माहिती आणि त्याची नोंद कशाप्रकारे ठेवायची हे समजावून सांगितले. मला “ गो पालन “संदर्भात काम मिळाले. दिनांक :१६ /११/२०१६ आय.बी.टी.ट्रेनिंग सोबत आम्हाला देखील आमचे प्...